करोनामुळे राज्यात पुन्हा संचारबंदीचे सावट...केंद्राने दिले महत्त्वपूर्ण निर्देश

करोनामुळे राज्यात पुन्हा संचारबंदीचे सावट...केंद्राने दिले महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई: महाराष्ट्र आणि केरळमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारनं केरळ आणि महाराष्ट्राला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण अधिक असेल तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रानं सांगितलं आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीला दोन्ही राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि केरळ सरकारला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम, कोविड सुसंगत वर्तणूक याचं पालन करण्यास सांगितलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनासंसर्गाचा दर आहे तिथं नाईट कर्फ्यू लावावा, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे. 

सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरताना दिसत आहे. राज्य सरकारकडून कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यातील काही कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असताना पाच जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सागंली आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post