माजी मंत्री राम शिंदे यांना दे धक्का, कट्टर समर्थकासह भाजप पदाधिकार्‍यांनी बांधले ‘घड्याळ’

 आ. रोहीत पवार यांचा दे धक्का , कर्जत भाजपा पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेशकर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आ. रोहित पवार यांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली . सत्तास्थाने खेचून आणण्यासाठी त्यांनी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले . कर्जतमध्ये राष्ट्रवादीची चलती सुरू झाल्याने भाजपातील अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला . आज कर्जतमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ.रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत शहरात शहराचा कायापालट होत होत आहे . त्यांच्या या विकासाच्या वाटेला साथ देण्यासाठी या भाजपाच्या नेत्यांनी प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले . नगरपंचायतीच्या येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत .

भाजपाचे जिल्हा संघटन सचिव प्रसाद ढोकरीकर , नगरसेवक लालासाहेब शेळके तसेच नितीन तोरडमल , कर्जत सोसायटीचे व्हॉईस चेअरमन देविदास खरात यांनी आज आ . रोहित पवार यांच्या उपस्थितीतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला . राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल शेलार , युवकचे कर्जत शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . यावेळी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील तनपुरे , कुंभेफळचे सरपंच संतोष नलवडे उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post