केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

 केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही,  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुंबई: शिष्टाचारानुसार कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणाले होते. मग त्याचं काय करणार?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.  

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल त्यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post