आकर्षक परतव्याच आमिष दाखवून गोळा केले पैसे...प्रसिध्द ज्वेलर्स अटकेत

आकर्षक परतव्याच आमिष दाखवून गोळा केले पैसे...प्रसिध्द ज्वेलर्स अटकेत  पुणे :  प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या  प्रणव मराठेंना अटक करण्यात आली आहे. 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी  मराठे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ठेवीदारांचे पैसे आकर्षक परतव्याच आमिष दाखवून गोळा केले. मात्र परत न दिल्याने ठेवीदारांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.


मराठे ज्वेलर्स हे पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स आहे. ठेवीदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असं आमिष प्रणव मराठे यांनी गुंतवणूकदारांना दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास केला असता 18 ठेवीदारांची तब्बल 5 कोटी 9 लाख 72 हजार 970 रुपयांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post