मंगल कार्यालयांची घरपट्टी माफ करावी ; असोसिएशची मागणी

 मंगल कार्यालयांची घरपट्टी माफ करावी : असोसिएशची मागणी


शासनाने पॅकेज जाहीर करुन टॅक्स माफ करावे- भगवान फुलसौंदर     नगर - नगर शहरातील मंगल कार्यालय व सांस्कृतिक भवन यांच्यावर लावण्यात आलेली घरपट्टी व शास्ती माफ करावी, या मागणीचे निवेदन अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनच्यावतीने महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष भगवान फुलसौंदर, उपाध्यक्ष मदन आढाव, कार्याध्यक्ष करिमभाई हुंडेकरी, प्रदीप पंजाबी, सचिव चंद्रकांत फुलारी, अजिंक्य पवार, सुरेश खरपुडे, दत्ता जाधव, विशाल पटवेकर, शिवाजी जाधव, भुषण गारुडकर, संजय जाधव, धनेश बोगावत, राहुल मनियार, अतुल जाधव आदि उपस्थित होते.


     निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग हे कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेले आहे. गतवर्षी मंगल कार्यालयामध्ये एकही लग्न सोहळा पार पडलेला नाही. मंगल कार्यालयाची भांडवली गुंतवणुक, कामगारांचा पगार, बँकांचे हप्ते, वीज बिल, इतर टॅक्सेस त्याचबरोबर महानगरपालिकेचा करांचा भार कार्यालयांच्या मालकांवर येऊन पडलेला आहे. सध्या मंगल कार्यालयावर लावण्यात आलेली घरपट्टी ही व्यापारी व क्षेत्रफळानुसार लावलेली असल्याने घरपट्टीची आकारणी मोठ्या प्रमाणात होत. पुढेही होऊ केलेल्या सहा महिन्यात एकही कार्यक्रम मंगल कार्यालयात होण्याची चिन्ह नाहीत. त्यामुळे मंगल कार्यालय व त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यवसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे कार्यालयाचे मालकही कर्ज बाजारी झालेले आहे. त्यामुळे कार्यालयधारक चालू वर्षी घरपट्टी व शास्ती भरु शकणार नाही, तरी ती माफ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


     याप्रसंगी अध्यक्ष भगवान फुलसौंदर म्हणाले, गेल्या दीन वर्षांपासून शासनाने सार्वजनिक, धार्मिक, लग्न सोहळे यांना बंदी घातल्यामुळे मंगल कार्यालय बंद आहेत. अजुन किती दिवस बंद राहिल हेही सांगता येत नाही. त्यामुळे सध्या यावर अवलंबून असणार्‍या लाखो लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्याचप्रमाणे मालकांनाही आता कार्यालयाचा मेंटनन्स व टॅक्स भरणे अवघड आहे.  त्यामुळे शासनाने या घटकांसाठी पॅकेज जाहीर करावे किंवा शासनाचे विविध  टॅक्स माफ करावे, अशी आमची मागणी आहे. आज अशी विनंती मनपास केली असून, महापौर व आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत यावर निर्णय घेऊन असे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post