सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या...

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या... 

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. वर्षभरापूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. तरुणाजवळ सुसाईड नोटही सापडली असून त्यात ‘आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन’ असं त्याने लिहिलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. त्यानंतर तिथे मृत्यू पत्र म्हणून चिठ्ठी सापडली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post