खा.सुजय विखेंची महाविकास आघाडीवर चौफेर टीका, नगर जिल्हा परिषद विकायचीच बाकी ठेवलीय


खा.सुजय विखेंची महाविकास आघाडीवर चौफेर टीका,
 नगर जिल्हा परिषद विकायचीच बाकी ठेवलीयनगर :  : फडणवीस सरकारने मंजुर केलेल्या कामांचे उदघाटन सध्या महाविकास आघाडी सरकार करत आहे .केंद्राचे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील पैसे व्याजाने घेऊन त्यांनी रुग्णवाहिका घेऊन हे सरकार शोबाजी करीत आहे इतकी लाचारी आघाडी सरकारने चालवली आहे . याचा सारा हिशेब घेऊन मी आगामी निवडणुकीत  येणार आहे अशी शद्बात खासदार डॉ . सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली .
शहर बाह्यवळण मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची सुरूवात  वाळुंज येथे विखे यांच्या हस्ते झाले . यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले , आमदार बबनराव पाचपुते , आमदार संग्राम जगताप उपस्थीत होते .४० किलो मिटर अंतराच्या १ हजार २६ कोटी रूपयांचा हा प्रकल्प दोन वर्षात पुर्ण होणार आहे . 
यावेळी डॉ . विखे म्हणाले की , इतके वर्ष राजकारण पाहतो पण आघाडी सरकार आल्यापासुन प्रथमच डीपी चे उदघाटन करायला मंत्री येतात .१० लाखांच्या कामासाठी १० तास भाषणे ठोकतात . महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात ज्या कामांचे भूमिपुजने केली ती फडणवीस सरकारच्या काळात मंजुर झालेली आहेत. याचा हिशेब घेऊनच आम्ही आगामी निवडणुकींच्या मैदानात उतरणार आहोत . दुसऱ्यांचे कामे आपल्या नावावर खपवण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत .
ते पुढे म्हणाले की , जाहिरातबाजी , शोबाजी करण्यात आम्ही कमी पडतो .रेमडेसेविर इंजेक्शनचा साधा फोटो काढला तरी आमच्या वाट्याला कोर्टबाजी आली .मात्र नगर जिल्हयाचे राजकारण जाहिरातबाजीवर चालत नाही त्यासाठी काम करावे लागते .
कार्यक्रमास  अभिलाष घिगे , संतोष म्हस्के , रेवणनाथ चोभे , रविंद्र कडुस , मनोज कोकाटे , दिलीप भालसिंग , सुरेश सुंबे , बाळासाहेब दरेकर , गहिनीनाथ दरेकर , अनिल करांडे आदि उपस्थीत होते .

 नगरची जिल्हा परिषद फक्त विकायची राहिली

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे यांनी नगर जिल्हा प़रिषदेच्या कारभारावरही टिका केली ते म्हणाले की नगरची जिल्हा परिषद फक्त विकायची बाकी असुन ती दहा टक्क्यांची दुकानदारी झाली आहे . प्रत्येक कामासाठी टक्केवारी चालते . त्यांच्या निधीतून सध्या झालेली कामे पहा . त्यांची अवस्था पहा . किती खायचं याचे लिमीटच नाही . मुळासकट माती ही खाली जात आहे अशी टिका विखे यांनी केली .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post