शहरासह जिल्ह्यात कोसळधार.... पावसाने मिळाला दिलासा


शहरासह जिल्ह्यात कोसळधार.... पावसाने मिळाला दिलासानगर:   नगर जिल्ह्यात मान्सूननं पुनरागमन केलं आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. अधूनमधून पडणार्‍या श्रावणसरींचा वर्षाव होत असल्याने कापूस, सोयाबीन, मका, मूग, उदीड व अन्य पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. .

सुरूवातीला पावसाने जोरदार सलामी दिल्यानंतर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली. पण त्यानंतर वरूणराजाने दांडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला होता. येणारा दिवस पावसाविना जात असल्याने त्याची धडधड वाढली होती. वाढलेल्या पिकांना वाचविण्यासाठी स्प्रिंकलर व अन्य साधनांच्या सहाय्याने त्याची धडपड सुरू होती. दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी स्थिती असतानाच, मंगळवार सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर रिमझीम सुरू झाली. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिके तरारली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post