चर्चा तर होणारच...आ.लंके व देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित 'हवाई' प्रवास...

 चर्चा तर होणारच...आ.लंके व देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित हवाई प्रवास...नगर : तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेले राष्ट्रवादीचे पारनरेचे आमदार निलेश लंके यांनी या प्रकरणात देवरे यांच्यावरच डाव उलटवला. यानंतरही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पारनेरला येत ज्योती देवरे यांची भेट घेतली तसेच या ऑडिओ क्लिपनिमित्त महाविकास आघाडी सरकारवर तसेच आ.लंके यांच्यावर निशाणा साधला. आ.लंके यांचे कौतुक करणार्‍या इंदूरीकर महाराज यांनाही वाघ यांनी फटकारले. मात्र यावेळी सोशल मिडियात आ.लंके व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित विमान प्रवासाचे फोटो व्हायरल झाले आहेत.  वर्धा येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी आ.लंके हे मुंबईहून नागपूरला विमानाने चालले असताना फडणवीसही विमानातळावर होते. आ.लंके यांनी फडणवीस यांच्यासोबत सेल्फीही घेतला. एकीकडे भाजपच्या महिला नेत्या पारनेरमध्ये येवून आ.लंकेंवर आगपाखड करीत असताना भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा फडणवीस हे आ.लंके यांच्यासोबत विमानप्रवास करीत असल्याचे चित्र यानिमित्त समोर आले आहे. या फोटोची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post