वंशाला दिवा हवा म्हणून महिलेसोबत अघोरी प्रकार, पती,सासूसह भोंदूबाबावर गुन्हा

 वंशाला दिवा हवा म्हणून महिलेसोबत अघोरी प्रकार, पती,सासूसह भोंदूबाबावर गुन्हा पुणे  : दोन्ही मुलीच झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून पती व सासू या दोघांनी मिळून पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा आणि हळदी-कुंकू फासले. खालुंब्रे (ता. खेड) येथे हा अघोरी प्रकार घडला. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर पती, सासू आणि भोंदूबाबांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला दोन मुली झाल्या. हे कारण तसेच लग्नात तिच्या आईवडिलांनी मानपान केला नसल्याच्या कारणावरून आरोपींनी विवाहितेला वेळावेळी मारहाण केली. वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा, असा तिचा पती व सासूचा आग्रह होता. पीडित महिलेवर ते वारंवार अत्याचार करत मारहाण करत होते.  

मुलगा व्हावा यासाठी हे दोघे कामशेत (ता. मावळ) येथील एका भोंदूबाबाकडे तिला घेऊन गेले. तिला समोर बसवल्यावर बाबाने हातातील कवड्या जमिनीवर टाकून मंत्र पुटपुटत हिशोब केल्याचे हातवारे केले. महिलेला मुलगा होण्यासाठी अंगारा खायला दिला. तसेच काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post