पाणी पुरीवरुन पती-पत्नीमध्ये वाद; पत्नीची विष प्राशन करुन आत्महत्या

 पाणी पुरीवरुन पती-पत्नीमध्ये वाद; पत्नीची विष प्राशन करुन आत्महत्यापुणे :  क्षुल्लक कारणावरुन पतीसोबत झालेल्या वादातून एका महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. प्रतिक्षा सरवदे असे मयत महिलेचे नाव असून गहिनीनाथ सरवदे असे पतीचे नाव आहे. पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. 

गहिनीनाथ आणि प्रतिक्षा हे जोडपे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त पुण्यात राहत होते. दोघेही पुण्यात आंबेगाव पठार परिसरात राहत होते. गहिनीनाथने ऑफिसमधून घरी येताना पाणीपुरी पार्सल आणली होती. मात्र यामुळे प्रतिक्षा संतापली. मला न विचारता पाणीपुरी का आणली म्हणून प्रतिक्षा चिडली. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि प्रतिक्षाने पाणीपुरी खाण्यास नकार दिला.


याच रागातून गहिनीनाथनेही दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला डबा घेऊन जाण्यास नकार दिला. याच रागातून प्रतिक्षाने विष प्राशन केले. यानंतर प्रतिक्षा बेशुद्धावस्थेत घरी पडल्याने शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान प्रतिक्षाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रतिक्षाच्या वडिलांनी गहिनीनाथ विरोधात भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गहिनीनाथला अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post