पोलिस कर्मचार्‍याला ‘भाईगिरी’ भोवली, व्हायरल व्हिडिओमुळे झाला निलंबित

पोलिस कर्मचार्‍याला ‘भाईगिरी’ भोवली, व्हायरल व्हिडिओमुळे झाला निलंबित अमरावती -जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी महेश काळे याने हातात पिस्तूल सारखे शस्त्र घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी घेतली असून या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

महेश काळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी हातात पिस्तूल सारख्या शस्त्राचा वापर करून व्हिडिओ तयार करून त्याच्यात भाईगिरी सारख्या भाषेचा वापर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर शासकीय गणेशाचा व शस्त्राचा चुकीच्या पध्दतीने गैरवापर केल्याचा व बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठेवला असून त्याला आता निलंबित केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post