तरूणाच्या घरात आढळला बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह, नगर जिल्ह्यातील घटना

तरूणाच्या घरात आढळला बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह, नगर जिल्ह्यातील घटनानगर : चितळी (ता. राहाता) येथे एका तरुणाच्या घरात अल्पवयीन आदिवासी मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या घरात मृतदेह सापडल्याने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चितळी येथे आकाश खरात हा आपल्या आजीसोबत त्याच्या घरी रहात होता. त्याचे कुटुंबिय कामानिमित्त औरंगाबाद येथे रहात असून, त्याची आजीही काही दिवसांपूर्वी औरंगाबादला गेली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आकाश घरी एकटाच रहात होता. दरम्यान त्याच घरात मुलीचा मृतदेह आढळुन आला तेव्हा आकाश घरात नव्हता. गावातील ग्रामस्थांनी घरात मृतदेह असल्याचे पोलीसांना दिली. त्यानुसार तालुका पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सबंधीत मुलीचे कुटुंबीय व नातेवाईकांनी फरार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी चितळी येथील आकाश राधू खरात (वय २५) नावाच्या तरुणाच्या घरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती येथील तालुका पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचासमक्ष मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला.पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post