आपल्याच बंधूच्या पत्नीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं ? सगळी प्रकरणं बाहेर काढणार...नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार


 

रत्नागिरी: दोनच दिवसांपूर्वी रंगलेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. एखाद्या दरोडेखोराप्रमाणे मला अटक करण्यात आली. मी शिवसेनेसोबत थोडीथोडकी नव्हे, ३९ वर्षे होतो. त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, असं सूचक विधान राणेंनी केलं. ते जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरीत बोलत होते.

शिवसेनेसोबत मी ३९ वर्षे काम केलंय. त्यामुळे अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत. रमेश मोरेंची हत्या कशी झाली. आपल्याच आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. सगळी प्रकरणं टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू, अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेला इशारा दिला. अनेक जुनी प्रकरणं आहेत. दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही, असं राणे म्हणाले. आज ना उद्या पूर्वी सारखा माझा आवाज खणखणीत होईल. आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार, असा इशाराही त्यांनी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post