स्वातंत्र्यदिनी भंडादरा परिसरात पर्यटनासाठी जाणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी...पोलिस आहेत सज्ज

 

स्वातंत्र्यदिनी भंडादरा परिसरात पर्यटनासाठी जाणार्‍यांसाठी महत्त्वाची बातमी...पोलिस आहेत सज्जस्वातंत्र्य दिनादरम्यान सलग तीन दिवस सुटी असल्याने पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रस्ते अरुंद असून, वाहतुकीची कोंडी होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तीन दिवस परिसरात एकेरी वाहतूक करण्यात आल्याची माहिती राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली. 

हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. सध्या तुरळक श्रावणसरी बरसत आहेत. त्यातच शनिवार ते सोमवारदरम्यान सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन राजूर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. या काळात एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दरवर्षी 14 ते 16 ऑगस्ट या कालावधीत मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात येतो. राजूरपासून भंडारदऱ्याकडे जाण्यासाठी आजपासून रंधा फाटा येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे, तर भंडारदऱ्याला जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश करता येईल. वारंघुशी फाटा, वाकी फाटा, चिचोंडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी, भंडारदरा धरण, स्पिलवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे, रंधा असा मार्ग असेल. एकेरी वाहतुकीतून ऍम्ब्युलन्स, अग्निशामक दल, शासकीय वाहनांना वगळण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post