नगरसह पाच जिल्ह्यांमुळे महाराष्ट्र चिंतेत, सर्वाधिक सक्रिय रूग्ण

नगरसह पाच जिल्ह्यांमुळे महाराष्ट्र चिंतेत, सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबई: राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. राज्यातील कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असताना पाच जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, सागंली आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.


महाराष्ट्रात 27 ऑगस्टला 4654 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 170 रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.12 टक्केवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील 62 लाख 55 हजार 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 97.02 टक्के वर पोहोचला आहे.


महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या 13715 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 7082, साताऱ्यात 5254 , सांगली जिल्ह्यात 4876 आणि अहमदनगर जिल्ह्यात 5295 सक्रिय रुग्ण आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post