हे सरकार कुछ दिनो के मेहमान....मी सगळ्यांना पुरून उरलोय

हे सरकार  कुछ दिनो के मेहमान....मी सगळ्यांना पुरून उरलोय मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी अटकेच्या प्रकरणावर शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. संजय राऊत  हे संपादकीय पदाच्या लायकीचे नाहीत. शिवसेनेने मला मुख्यमंत्री केले, मी गँगस्टर असेल तर मुख्यमंत्री केले. आत्ताही तेच असतील. मी १७ तारखेनंतर राऊतांना उत्तर देईन असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दिला आहे. 


नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, सामाना अग्रलेखात उद्धव ठाकरेंना खुश करण्यापुरत लिहिलं जातं. मला वाटत नाही त्यावर मी प्रतिक्रिया द्यावी. शिवसेनेने मुख्यमंत्री पद दिलं कारण कतृत्व होतं ते सिद्ध करून दाखवलं. आता कुणी कतृत्वान आहे का? हे सरकार कायम स्वरुपी नाही. कुछ दिनो के मेहमान आहे. गँगस्टर असताना शिवसेनेने मला मुख्यमंत्री केले, मग आताही मंत्री तेच असतील ना असं राणेंनी सांगितले. शिवसेना नेत्यांनी कधी असे शब्द उच्चारले नाहीत का? मी कुणालाही घाबरत नाही. मी सगळ्यांना पुरून उरलोय. मी आता यापुढे जपून पावलं उचलणार आहे. आम्ही तिघं घरात नसताना आंदोलन केले. तुम्हाला घर नाहीत? मुलंबाळं नाहीत का? असा सवालही राणेंनी विचारला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post