भाजप जदयूमध्ये बिनसणार! नितीशकुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार?

देश का पीएम कैसा हो नीतीश कुमार जैसा हो

 


जनता दल यूनायटेड  राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नसले तरी त्यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण असल्याचं म्हटलं आहे. राजीव रंजन यांच्या याच वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळामध्ये सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या जदयू आणि भाजपा युतीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. ललन सिंह यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना याचसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. याबैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार पत्रकारांशी बोलत असताना समर्थकांकडून, ‘देश का पीएम कैसा हो नीतीश कुमार जैसा हो’ अशी घोषणाबाजीही झाली. दरम्यान नितशी हे सर्वगुण संपन्न असे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याच्या या चर्चांमुळे भाजपा-जदयू युतीसंदर्भात चर्चांना उधाण आलाय.

नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण आहेत. मात्र पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि पंतप्रधान पदासाठी दावा करणे या दोघांमध्ये फार अंतर आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम असेल त्यांना मी हे सांगू इच्छितो की आमच्या नेत्यामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, असं ललन सिंह म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post