घर घर मोदी.....पंतप्रधान नरेंद्र मोदी आता चांदीच्या मूर्तीच्या रुपात

 

घर घर मोदी.....पंतप्रधान नरेंद्र मोदी आता चांदीच्या मूर्तीच्या रुपातनवी दिल्ली -   मोदी कुर्ता आणि मोदी जॅकेटनंतर थेट पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे.  

देवी देवतांच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती आपण नेहमीच पाहतो पण आता मोदींची मूर्ती बाजारात आल्याने ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. इंदूरचे सराफा व्यापारी निर्मल वर्मा यांनी मुंबईतून ही मूर्ती तयार करून घेतली आहे . आपल्या दुकानातून या मूर्तीची विक्री करण्याचा वर्मा यांचा मानस आहे. सध्या दोन मूर्ती आल्या आहेत. 

नरेंद्र मोदींच्या 150 ग्राम मूर्तीची किंमत 11 हजार रुपये निर्धारीत करण्यात आली आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांत या मूर्ती असणार आहेत. वर्मा यांच्याकडे सध्या केशरी आणि निळ्या रंगातील कुर्त्यामधील दोन मूर्ती पोहचल्या आहेत तर पाच लवकरच दाखल होणार आहेत. मुंबईच्या एका मोठ्या ज्वेलर्स शोरुमवर पंतप्रधान मोदींच्या चांदीच्या मूर्ती पाहिल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीच्या मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली होती. त्यांनी याआधी मोदींचा फोटो असलेली चांदीची नाणी विकली होती. नरेंद्र मोदींना आपल्या हस्ते एक मूर्ती भेट द्यावी अशी निर्मल वर्मा यांची इच्छा आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post