‘ती’ व्यक्ती समोर येताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खुर्चीतून उठले...केला आदरपूर्वक नमस्कार

 ‘ती’ व्यक्ती समोर येताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खुर्चीतून उठले...केला आदरपूर्वक नमस्कार\मुंबई –पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी आणि नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी कोकणातील चिपळूण, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरचा दौरा केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यातील एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत मुख्यमंत्री खुर्चीतून उभे राहून हात जोडल्याचं पाहायला मिळत आहे. हे हात मुख्यमंत्र्यांनी कोणाला जोडले आहेत? मुख्यमंत्री खुर्चीतून का उठले? याबद्दल अनेकांना माहिती नाही. मात्र या फोटोमागची कहाणी आता समोर आली आहे. पूरग्रस्त भागाचा दौरा करुन मुख्यमंत्री सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तेव्हा एक व्यक्ती याठिकाणी निवेदन देण्यासाठी आली होती. ही व्यक्ती विश्वनाथ मिरजकर.

विश्ननाथ मिरजकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही पहिली भेट होती.तेव्हा राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वनाथ मिरजकर हे ज्येष्ठ शिक्षक आणि शिक्षण चळवळीचे नेते असल्याची ओळख करून दिली. त्यावेळी आपल्यासमोर एक ज्येष्ठ शिक्षक उभे आहेत लक्षात येताच मुख्यमंत्री तात्काळ खुर्चीवरून उठले आणि विनम्रपणे हात जोडून त्यांचे प्रश्न समजून घेतले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्याच भेटीत दिलेल्या वागणुकीनं विश्वनाथ मिरजकर भारावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post