राणेंच्या ‘त्या’ वक्तव्या प्रकरणात पोलिसांनी कायद्याने काम करावे, देवेंद्र फडणवीस यांचा सल्लावजा इशारा

 


राणेंच्या ‘त्या’ वक्तव्या प्रकरणात पोलिसांनी कायद्याने काम करावे, देवेंद्र फडणवीस यांचा सल्लावजा इशारामुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत पोलिसांना इशारा वजा सल्ला दिलाय. पोलिसांनी जे काम करायचं ते कायद्यानं करावं, बेकायदेशीर काम करणारे कुठं आहेत ते लक्षात ठेवावं, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यावेळी त्यांनी सरकार बदला घेण्यासाठी पोलिसांचा उपयोग करत असल्याचा आरोप केला. तसेच हे सरकार अलिकडे पोलीसजीवी झाल्याचा आरोप केला. 

“पोलिसांना मी सल्ला देऊ इच्छितो, मी काही धमकी बिमकी देत नाही. पोलिसांना एवढाच सल्ला आहे की कायद्यानं काम करा. बेकायदेशीर काम करणारे पोलीस आत्ता कुठं आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे पोलिसांनी कायद्यानं काम करावं. एकाच गुन्ह्यासाठी 3-3 ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. 3-3 पथकं अटक करायला जातात. दखलपात्र गुन्ह्याला अदखलपात्र केलं जातं. शर्गिल उस्मानीसाठी ही ताकद दाखवावी.”

मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वाक्यानं मोठा वाद निर्माण झालाय. मुळात राणे साहेब हे बोलण्याच्या ओघात हे झालं असावं. पण मुख्यमंत्री स्वातंत्रदिन विसरतात तेव्हा कोणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे. भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नसेल पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीनं राणेंसोबत आहे. ज्या पद्धतीनं कारवाई होतेय ही चुकीची आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post