महिला अधिकार्‍याला होणार्‍या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’अशी करणं दुर्दैवी...

 महिला अधिकार्‍याला होणार्‍या त्रासाची तुलना ‘कुत्री भुंकतात’अशी करणं दुर्दैवी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे व्टिटमुंबई : तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके वादाच्या भोवर्‍यात सापडले. या प्रकारानंतर ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी नुकतीच भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर येथे किर्तन केले. या किर्तनावेळी इंदुरीकर महाराज यांनी आ.निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करीत हत्ती चालताना कुत्री भुंकतात असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी समाचार घेत महाराज महिलांना छळायची शिकवण देताय का? असे व्टिट केले आहे

वाघ यांनी म्हटले आहे की, राज्यातील भोळ्या भाबड्या भगिनी मन लाऊन ज्यांचं किर्तन ऐकतात त्या ह.भ.प नी एका महिलेचीचं प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणार्या त्रासाची तुलना “कुत्री भुंकतात” अशी करणं अतिशय दुदैवी…या सत्तेतील बेलगाम घोड्यांना “हत्ती”म्हणतं बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का??

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post