साधं पाणी नाही...विराट कोहलीसह सेलेब्रिटी पितात ‘इतक्या’ हजार रुपये लिटरचे ब्लॅक वॉटर

साधं पाणी नाही...विराट कोहलीसह सेलेब्रिटी पितात 4 हजार रुपये लिटरचे ब्लॅक वॉटर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा फिटनेसला किती महत्त्व देतो, हे सर्वांना माहित आहे. भारतीय संघात खेळाडूंच्या फिटनेससाठी Yo yo टेस्टची संकल्पना ही विराटनेच आणली. त्यामुळेच सध्याच्या घडीतील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली आघाडीवर आहे. व्यायाम व डाएट हेच विराटच्या तंदुरुस्तीमागचं कारण नाही, तर त्याच्या डाएट प्लानमध्ये असलेलं पाणी यानंही मदत मिळते.  विराट कोहली ‘Black Water’ पितो. फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी हे विरट ब्लॅक अल्कलाइन वॉटरचं सेवन करतो. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा, उर्वशी रौतेला, श्रुती हसन याही ब्लॅक वॉटरचं सेवन करतात. ब्लॅक वॉटर तयार करण्यासाठी ब्लॅक मिनरल्सचा वापर केला जातो. पाण्यात 70 टक्के खनिजं टाकली जातात, त्यामुळे पाण्याचा रंगही काळा होतो. यामुळेच हे पाणी साध्या पाण्यापेक्षा जास्त हेल्दी  होतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post