शेवगाव केसरी स्पर्धेत नगरचा मल्ल महेश लोंढे यांनी पटकावली चांदीची गदा

 शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेत नगरचा मल्ल  महेश लोंढे यांनी पटकावली चांदीची गदा



नगर - येथील कुस्तीपटू  महेश रामभाऊ लोंढे याने शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदानात उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकाविली. नुकतेच शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महेश लोंढे यांची मयुर चांगले (शिर्डी) यांच्यात मॅटवर कुस्ती झाली. विजेत्या मल्लास उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते चांदीच्या गदेसह 51 हजार रूपये रोख, मेडल व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
 महेश लोंढे कोल्हापूर मधील पै.राम सारंग यांच्या तालिमीत सराव करीत आहे. नालेगाव येथील प्रसिध्द मल्ल रामभाऊ लोंढे यांचे ते चिरंजीव असून, त्याला कुस्ती क्षेत्राचा वारसा लाभला आहे. विजेत्या मल्लास कुस्ती स्पर्धेसाठी पै. संभाजी लोंढे, नगरसेवक पै. सुभाषभाऊ लोंढे, पै.शामभाऊ लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पै. राजूभाऊ लोटके, पै. संदीपदादा लोटके, पै. शुभम लोंढे, पै. निलेश शिंदे, पै. संतोष झुंगे, पै. अजय शेडाले, पै. खंडू धुमाल, पै. मनोज काजले, पै. आदेश बचाते, सगर बेरड, सुभाष बोरुडे, विजुमामा लांडे, गंगाशेठ खंडारे, बंडूपंत चौधरी, अमित आंधळे, सोनू भोसले, शिरीष विधाते यांनी त्याचे अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post