ओ लंके...आमचे नेते देवेंद्रजी माघार घेत नाहीत...आम्ही देवरेंच्या मागे सक्षमतेने उभे

ओ लंके...आमचे नेते देवेंद्रजी माघार घेत नाहीत...आम्ही देवरेंच्या मागे सक्षमतेने उभेनगर : तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेरचे आ.निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला असताना आज आ.लंके यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला. त्यामुळे भाजपने लंके विरोध मागे घेतल्याची चर्चा सुरु असताना चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा लंकेंवर निशाणा साधला आहे. आमचे नेते देवेंद्रजी माघार घेणारे नाहीत तर दोनशे पाउल पुढे जावून ठोकणारे आहेत हे लक्षात ठेवा अशी प्रतिक्रिया वाघ यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरुन दिली आहे.


चित्रा वाघ यांनी म्हटले आहे, 

 कमाल आहे…..आमचे नेते #Dev_Fadnavis जी सोबत फोटो काढून लगेच भाजपची दोन पावले माघार ची बातमी छापून आणलीत…

ओ….लंके
ते आमचे नेते देवेन्द्रजी आहेत दोन पावले माघार घेतं नाही तर २०० पाऊले पुढे जात ठोकणारे….
हे ध्यानात ठेवा
ज्योतीताई देवरेच्या मागे आम्ही सगळे सक्षमतेने उभे…

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post