राज्यात राजकीय धमाका...भाजपात गेलेले अनेक नेते घरवापसीच्या तयारीत...

 राज्यात  राजकीय धमाका...भाजपात गेलेले अनेक नेते घरवापसीच्या तयारीत...



 सांगली: मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सरकार परत येणार म्हणून भाजपमधील इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन झाले. आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अनेक बडे नेते पुन्हा राष्ट्रवादीत परत येण्याच्या तयारीत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.   

नारायण राणे यांच्या अटक व जामीन नाट्यानंतर पोलीस आणि गुंडांच्या बळावर ठाकरे सरकार चालतेय, अशी टीका करण्यात आली होती. या टीकेलाही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचे नेते वैभव शिंदे यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेकांशी बोलणे सुरू असून, योग्य वेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परत येण्याच्या तयारीत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post