सकारात्मक.. भारतातून करोना जवळपास संपण्याच्या स्थितीत

सकारात्मक...तज्ज्ञ म्हणतात भारतातून करोना जवळपास संपण्याच्या स्थितीत भारतातील करोना जवळपास संपण्याच्या स्थितीत आला असून, या टप्प्यावर अल्प किंवा मध्यम पातळीवर रोगाचा प्रसार सुरू राहतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मंगळवारी म्हटले आहे.

लोक जेव्हा विषाणूशी जुळवून घेतात त्या वेळी हा टप्पा येतो. साथीच्या टप्प्यापेक्षा हा टप्पा वेगळा असतो. साथीच्या टप्प्यात विषाणू लोकसंख्येला बाधित करतो. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने दोनच दिवसांपूर्वी देशात तिसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. ‘द वायर’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत स्वामीनाथन म्हणाल्या, ‘भारताचा आकार आणि लोकसंख्येतील विविधता व विविध भागात असलेली इम्युनिटी यामुळे देशाच्या विविध भागात करोनाची स्थिती अशीच वर-खाली राहण्याची खूप खूप शक्य आहे. रोगप्रसार कमी किंवा मध्यम पातळीवर राहण्याच्या टप्प्यात आपण प्रवेश करत असू. या स्थितीत रुग्णवाढीचा वेग आणि सर्वोच्च लागणबिंदू दिसत नाही. जो काही महिन्यांपूर्वी होता. त्यामुळे येत्या काही काळात देशाच्या विविध भागात करोनाची स्थिती खाली-वर राहण्याची खूप शक्यता आहे. ज्या भागात किंवा गटांना पूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लागण झालेली नाही किंवा ज्या भागात फारसे लसीकरण झालेले नाही अशा ठिकाणी रुग्णवाढ उच्चांकी दिसेल आणि ही स्थिती पुढील अनेक महिने राहील.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post