तुमच्या बँक खात्यात एलपीजी सिलेंडरची सबसिडी जमा होतेय का? ‘असे’ करा चेक...

तुमच्या बँक खात्यात एलपीजी सिलेंडरची सबसिडी जमा होतेय का? नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलेंडर च्या किंमतीत सातत्याने वाढ पाहायला मिळते आहे.  एलपीजी सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. याआधी तुम्ही एलपीजी सबसिडीचे लाभार्थी आहात की नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे. 

तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे तपासा. तुमच्या खात्यात पैसे येत आहेत की नाही हे पाहणं आवश्यक आहे. जर हे पैसे येत नसतील तर तुमचं बँक खातं त्वरित आधारशी लिंक करा. लिंक केल्यानंतर पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येतील. 

सर्वात आधी www.mylpg.in वेबसाइटला भेट द्या

*यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला तीन कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल.

*यापैकी तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या फोटोवर क्लिक करा

*यानंतर नवीन विंडो ओपन होईल, यामध्ये तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती असेल

*याठिकाणी साइन इन किंवा न्यू युजरचा पर्याय निवडा

* यानंतर आणखी एक नवीन विंडो ओपन होईल, याठिकाणी व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्रीचा पर्याय सिलेक्ट करा

* याठिकाणी तुम्हाला कळेल की तुम्हाला सबसिडी मिळते आहे की नाही. जर मिळत नसेल तर तुम्ही 18002333555 टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post