हिंदुत्त्ववाद्यांची तुलना तालीबानींशी...अभिनेत्री स्वरा भास्करचे वादग्रस्त व्टिट

हिंदुत्त्ववाद्यांची तुलना तालीबानींशी...अभिनेत्री स्वरा भास्करचे वादग्रस्त व्टिट बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपली मते ट्विटरच्या माध्यमातून वरचेवर मांडत असते. ती मांडत असलेल्या मतांवरून अनेकदा वाद निर्माण झालेला पाहायला मिळतो. बुधवारी पुन्हा असंच घडलं. स्वरा भास्करने हिंदुत्वाची तुलना तालिबानच्या दहशतवादाशी केली. स्वरा भास्करने बुधवारी ट्विट करताच तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. यातून #ArrestSwaraBhasker या ट्रेंडलाही सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post