दारु सुटण्यासाठी महाराजाने दिलेले औषध बेतलं जीवावर...एकाचा मृत्यु

दारु सुटण्यासाठी महाराजाने दिलेले औषध बेतलं जीवावर...एकाचा मृत्यु जालना : दारूचं व्यसन सोडण्याचं औषध दिल्यानं एका जणाचा मृत्यू झाला आहे. ४० वर्षीय गोपाल दवांडे असं या औषधाचं सेवन केल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्याच नाव असून तो अकोला जिल्हयातील शिसामासा गावचा रहिवासी आहे. तर, दारूचं व्यसन सोडण्यासाठी औषध देणारा महाराज हा जालन्यातील धावडा गावचा रहिवासी आहे.


महाराजाने दिलेल्या औषधामुळे मृत्यू झाल्यानं मयताच्या नातेवाईकांनी मयताचा मृतदेह औषध देणाऱ्या महाराजांच्या घराच्या दरवाज्यात आणून ठेवल्यानं महाराज फरार झाला आहे. तडवी बाबा असं फरार झालेल्या महाराजाच नाव आहे. शिसामासा येथील गोपाल दवांडे यांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी त्यांना  जालन्यातील धावडा येथील तडवी बाबा या महाराजाकडे आणण्यात आलं होतं. या महाराजाने दारु सोडवण्यासाठी साडेचार हजार रुपये घेऊन त्यांना दोन ग्लास औषध पाजलं.त्यानंतर गोपाल दवांडे हे बेशुध्द अवस्थेत होते.  दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. दरम्यान, या महाराजावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post