प्रेयसीशी वाद...तरूणाने फेसबुक लाईव्ह करीत केली आत्महत्या...

प्रेयसीशी वाद...तरूणाने फेसबुक लाईव्ह करीत केली आत्महत्या... मुंबई: किरकोळ कारणातून वाद  झाल्यानंतर, 'मला तुझी गरज नाही, तू मरून जा' असे उद्गार प्रेयसीनं काढल्यामुळे मुंबईत एका तरुणानं खरोखर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणानं फेसबुक लाइव्ह करत आपली जीवनयात्रा  संपवली आहे. प्रेयसीनं छळामुळेच तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.


माझी प्रेयसी पहिल्यासारखा प्रतिसाद देत नाही. याबाबत विचारणा केली असता, तरुणीने मला तुझी गरज नाहीये, तू मरून जा....' असं म्हटल्यामुळे मुंबईतील एका तरुणानं आत्महत्या केली आहे. अंकुश नामदेव पवार असं आत्महत्या करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मुळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं प्रेमात धोका मिळाल्यानं आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आहे. संबंधित घटना गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post