धक्कादायक...जिल्ह्यात महीला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

 धक्कादायक...जिल्ह्यात महीला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या घरात गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; पोलिसांकडून तपास सुरु..



संगमनेर शहरातील प्रसिद्ध बाल रोगतज्ज्ञ डॉ.योगेश निघुते यांच्या पत्नी डॉक्टर पुनम यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संगमनेरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत महिला डॉक्टरच्या नातेवाईकांच्या भूमिकेनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. एका शांत आणि संयमी स्वभावाच्या महिला डॉक्टरने अशा पद्धतीने आपले जीवन संपवल्याने संगमनेरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावरील ताजणे मळा परिसरात असलेल्या चिरायु रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सदरची घटना घडली. डॉक्टर पुनम योगेश निघुते (वय 35) यांनी रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरील निवासस्थानात आपल्या खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दत्तात्रय जोंधळे यांनी दिलेल्या खबरी वरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत पूनम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी अथवा संदेश मागे सोडल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली असावी हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिकेच्या कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post