१०० कोटींची वसुली प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचीट

 


१०० कोटींची वसुली प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचीटमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लिनचिट मिळाल्याची माहिती कळते आहे. 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे. सीबीआयचा हा 65 पानी अहवाल आहे. उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केलाय. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

सीबीआयचे उपअधिक्षक आर एस गुंजाळ यांनी चौकशी अहवाल सादर केलाय. या अहवालात देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post