भाजप युवा वॉरिअर्सची पुरग्रस्तांसाठी मदत रवाना

 भाजप युवा वॉरिअर्सची पुरग्रस्तांसाठी मदत रवाना

पुरग्रतांना मदतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची गरज-विशाल खैरे     नगर - नुकत्याच कोकणासह कोल्हापुर, सांगली भागात अतिवृष्टीमुळे जी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. अनेकांची घरेच दरडीखाली आल्याने होत्याचे नव्हते झाले.  अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. आपल्या छोट्याशा  मदतीच्या स्वरुपातून आपल्या मागे सर्व उभे आहोत, ही भावाना निर्माण होऊन त्यांना उभारी मिळण्यास मदत होईल. भाजप युवा वॉरिअर्स नेहमीच दुर्लक्षित घटकांच्या पाठिशी उभी राहिली आहे. शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, युवा नेते सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवा वॉरिअर्सचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, यापुढील काळातही असेच उपक्रम राबविले जातील, असे प्रतिपादन  युवा वॉरिअर्स शहर जिल्हाध्यक्ष विशाल खैरे यांनी केले.

     भाजपा युवा वॉरिअर्सच्यावतीने पुरग्रस्तांसाठी अत्यावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. याप्रसंगी युवा वॉरिअर्स शहर जिल्हाध्यक्ष विशाल खैरे, गोकूळदास मुंदडा, विजय गायकवाड, मुन्ना पंचमुख, गणेश शेलार, बंट्टी भिंगारदिवे, पिनू वनवे, भैय्या लोखंडे, सागर वाळके, सोनू बनकर, भैय्या वर्मा, छोटू पेंटर, अक्षय बडे, मनोज कावळे, ओंकार शिंदे, सनी खैरे आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post