ईडीचा दणका...एकनाथ खडसेंची ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

ईडीचा दणका...एकनाथ खडसेंची  मालमत्ता जप्त

 


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने  धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.

भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तुवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवली होती. गेल्या महिन्यात खडसेंची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली होती.


पुण्यातील भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांना एका निवेदनाद्वारे 14 दिवसांची वेळ मागितली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post