राणेंच्या घरासमोर ‘आवाज’ देणारे युवा सेनेचे शिलेदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


राणेंच्या घरासमोर ‘आवाज’ देणारे युवा सेनेचे शिलेदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मुंबईत जुहू इथं राणेंच्या घरासमोर जाऊन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या राणे पितापुत्रांना 'आवाज' दिला. या आंदोलनाची राज्यभर चर्चा होती. आंदोलनानंतर रात्री युवा सेनेच्या प्रमुख शिलेदारांनी 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना शाबासकी दिल्याचं सूत्रांकडून समजतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post