सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर राष्ट्रवादीत

 सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर राष्ट्रवादीतअकोला : सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे दोघेही पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात करणार काम करणार आहेत. आज पुण्यातील राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात या दोघांनीही राष्ट्रवादीत औपचारिक प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री आणि राष्ट्रवादी चित्रपट आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे यांची उपस्थिती होती. रघुवीर खेडकर तमाशा फडमालक आणि कलाकारांची संघटना असलेल्या 'अखिल भारतीय तमाशा परिषदे'चे अध्यक्ष आहेत. तर मंगला बनसोडे या या संघटनेच्या कार्याध्यक्ष आहेत. या दोघांचा विधिवत प्रवेश लवकरच पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते प्रमुख्याने उपस्थितीत राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष  बाबासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. मुंबईत होणाऱ्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अनेक तमाशा फडमालक आणि कलाकाार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post