उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नाही, कॉंग्रेस मंत्र्याचा गंभीर आरोप

 आघाडीत नाराजीचे सूर.... उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नाही, कॉंग्रेस मंत्र्याचा गंभीर आरोपअकोला : राज्यातील महाविकास आघाडीत असलेली धुसफूस पुन्हा एकदा बाहेर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा आरोप करत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मदतीसाठी साद घातलीय. त्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. शळद

यशोमती ठाकूर म्हणाल्या, “मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढलेले नव्हते. या कामाला 450 रुपये मिळत होते. आपण आता आम्ही हे वाढवून 1,125 रुपये केले. यासाठी किमान 2,500 रुपये मिळावेत अशी माझी इच्छा आहे. असा प्रस्ताव आम्ही पाठवलाय. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post