कार्यकर्त्यांने स्वतःच्या रक्ताने लिहिले शुभेच्छा पत्र.... अजितदादा म्हणाले....

कार्यकर्त्यांने स्वतःच्या रक्ताने लिहिले शुभेच्छा पत्र.... अजितदादा म्हणाले.... पुणे : बारामतीतील माजी नगरसेवक अभिजीत काळे यांनी आपल्या रक्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शुभेच्छा पत्र लिहिलं होतं. हे पत्र काळे यांनी शनिवारी अजित पवार यांना भेट दिलं. यावेळी अजितदादांची कार्यकर्त्यांबाबत असलेली आस्था बारामतीकरांना अनुभवायला मिळाली. मात्र, अजित पवार यांनीही आपल्या कार्यकर्त्याला सल्ला दिलाय. “अरे तुमचं माझ्यावर प्रेम आहे; पण असं नाही करायचं”, असा सल्ला देत अजितदादांनी कार्यकर्त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या. स्पष्टवक्ता, परखड आणि शिस्तप्रिय म्हणून अजितदादांची राज्यात ओळख आहे. मात्र कार्यकर्त्यांबद्दल आस्था बाळगणारे अजितदादा आज बारामतीकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post