आरपीआय युवकची जिल्हा कार्यकारणी जाहीर

 आरपीआय युवकची जिल्हा कार्यकारणी जाहीर

युवक ही आरपीआयची खरी शक्ती - श्रीकांत भालेरावनगर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवकची जिल्हा कार्यकारणी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली. नुकतीच अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे आरपीआयच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यामध्ये युवकची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक राहुल कांबळे, आय.टी. सेल जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, मराठा आघाडीचे शशिकांत पाटील, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, पाथर्डी युवक तालुकाध्यक्ष महेश आंगारखे, उत्तरेचे युवक जिल्हाध्यक्ष सरपंच महेंद्र साळवी, ज्येष्ठ नेते विजय भांबळ, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, नेवासाचे युवा नेते प्रकाश वाघमारे, विलास साठे, अक्षय भिंगारदिवे, वसंत भिंगारदिवे, आकाश तांबे, शफीक मोगल, जावेद पटेल आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 नूतन कार्यकारणीत युवक जिल्हा उपाध्यक्षपदी नगर तालुक्यातून प्रविण वाघमारे, महादेव भिंगारदिवे, अक्षय गाडे, आशिष भिंगारदिवे, आकाश बडेकर, संदीप सकट, शेवगाव तालुक्यातून गौरव मगर, पाथर्डी तालुक्यातून प्रशांत बळीत, कर्जत तालुक्यातून विशाल काकडे तर युवक जिल्हा सरचिटणीसपदी दया गजभिये, गौतम कांबळे, युवक जिल्हा संघटकपदी नितीन निकाळजे, श्रीगोंदातून बापू भोसले, नगर तालुका युवक कार्यकारिणी उपाध्यक्षपदी महेश शिंदे, विलास साळवे, विशाल कदम, सरचिटनिसपदी निखिल सुर्यवंशी, संघटकपदी महेंद्र मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या नूतन पदाधिकार्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी अभिनंदन केले.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post