वाहतूक नियमांचे उल्लंघन, पोलिसांनी केले दुचाकीस्वाराला ‘एअरलिफ्ट’

 वाहतूक नियमांचे उल्लंघन, पोलिसांनी केले दुचाकीस्वाराला ‘एअरलिफ्ट’पुणे : पुण्यात वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला चक्क गाडीसकट टेम्पोत भरले. समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात हा प्रकार घडला. वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा पद्धतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसाने करणे, तरी कुठपत योग्य आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.ज्या पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, त्याबद्दल पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वाहन उचललं असतं तर ठीक पण वाहनासह चालकालाही उचललं जाण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचं मत पुणेकर व्यक्त करत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post