आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं, आ.रोहित पवारांच्या अर्थमंत्र्यांना हटके शुभेच्छाआ.रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा दिल्या आहेत. पेट्रोलियम इंधनाच्या दराने शंभरी केव्हाच पार केली आहे. तोच धागा पकडत आ.पवार यांनी पेट्रोल डिझेलच्या दराप्रमाणे तुम्ही आयुष्याचे शतक पार करावं अशा शब्दात शुभेच्छा दिल्यात. आ.पवार यांच्या या व्टिटला नेटकर्‍यांनीही चांगलीच दाद दिली आहे.

आ.पवार यांचे  व्टिट... 

देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री  निर्मला सितारामणजी आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचं शतक पार करावं आणि त्यासाठी आपणास उत्तम आरोग्य लाभावं, ही प्रार्थना!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post