साहसी पर्यटन जीवावर बेतले, मुळा धरणात एक जण बुडाला...

 

साहसी पर्यटन जीवावर बेतले, मुळा धरणात एक जण बुडाला...नगर:  स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा  आनंद लुटण्यासाठी मुळा धरण पाहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी  दोन जणांना थेट धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाल्याने ते पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्यात दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. धरणात मासेमारी करणार्‍या तरुणांनी प्रयत्न करत एकाला वाचविले. दुसरा सवंगडी विस्तारलेल्या अथांग पाण्यात गायब झाला. त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला.


रावसाहेब भीमराज मते (वय 40, रा. मुलनमाथा, राहुरी) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) यास धरणात मासेमारी करणार्‍या तरुणांनी बुडताना वाचविले.

पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना घटनेची माहिती समजताच रविवारी दुपारी तीन वाजता पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, कॉन्स्टेबल अण्णासाहेब चव्हाण, संजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले.

मुळा धरणाच्या चमेली अतिथीगृहाकडे पर्यटक जाऊ नयेत. यासाठी खंदक करून, वृक्षारोपण करण्यात आले. परंतु, पर्यटकांनी खंदक बुजवून पुन्हा रस्ता तयार केला. तेथे फलक लावून, पर्यटकांनी पाण्यात उतरू नये. यासाठी धोक्याचा इशाराही दिलेला आहे. असे असताना पर्यटक त्याकडे दुर्लक्ष(करतात. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post