‘या’ कारणामुळे अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावरच झाडल्या गोळ्या,

 अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावरच झाडल्या गोळ्या,  जयपूर :  शाळेतून काढून टाकल्यामुळे  बारावी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षक नटवर यादव (४५) यांच्यावर गोळी झाडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार येथील कोटपुतली तहसीलमध्ये नारेदा भागाजवळ घडला. बराच रक्तस्राव झाल्यामुळे यादव यांना आधी स्थानिक रुग्णालयात व नंतर विशेष उपचारांसाठी येथील एसएमएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हा विद्यार्थी शिक्षकांशी नेहमी भांडायचा म्हणून गेल्या वर्षी त्याला शाळा सोडल्याचा दाखला शिक्षकाने दिला होता. नारेदात रस्त्याने यादव दुचाकीने घरी जात असताना दोन अल्पवयीन युवकांनी त्यांना अडवले व त्यातील एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. हरयाणातील या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post