मालकाचे 30 लाख आणि 75 ग्रॅम सोनं घेवून नोकर पसार...पोलिसांत फिर्याद दाखल

मालकाचे 30 लाख आणि 75 ग्रॅम सोनं घेवून नोकर पसार...पोलिसांत फिर्याद दाखल

 


नगर - नोकराकडे बँकेत भरण्यासाठी दिलेले 30 लाख व पुणे येथील सोनाराला देण्यासाठी दिलेला 75 ग्रॅम सोन्याचा तुकडा घेऊन नोकर गायब झाला आहे.  नोकराने फसवणूक केल्याचे लक्षात येताच व्यवसायिक संतोष सोपान बुराडे (वय 59 रा. गुलमोहर रोड, सावेडी) यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क करून गुरूवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. नोकर नवनाथ अनिल केरूळकर (रा. शेंडी पोखर्डी ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्यवसायिक बुराडे यांच्याकडे नवनाथ केरूळकर नोकर म्हणून कामाला होता. बुराडे यांनी त्याच्याकडे गुरूवारी सकाळी प्रवरा सहकारी बँकेच्या नगर शाखेत भरणा करण्यासाठी 30 लाख रूपये दिले होते. ते 30 लाख रूपये बँकेत भरून पुणे येथील पायल गोल्ड यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस करण्याचे सांगितले होते. आरटीजीएससाठी बुराडे यांनी केरूळकर याला बँकेचा चेकही दिला होता. तसेच 75 ग्रॅम सोन्याचा तुकडा दिला होता. बँकेतील काम झाल्यानंतर तो सोन्याचा तुकडा पुणे येथील सोन्या मारूती चौकातील सोन्याचे दागिणे तयार करणारे कारागिर नीलेश सोनी याला देवून येण्याचे सांगितले होते.

केरूळकर पैसे व सोन्याचा तुकडा घेऊन गेल्यानंतर मोबाईल बंद होता. त्याच्या घरी बुराडे यांनी संपर्क साधला. तो घरी नव्हता. शेवटी बुराडे यांनी पोलिसांशी संपर्क साधून फसवणूक झाल्याचे सांगितले.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post