मद्यधुंद तरूणीचे भर रस्त्यात लोळण...व्हिडिओ व्हायरल...

पुण्यात मद्यधुंद तरूणीचे भर रस्त्यात लोळण...व्हिडिओ व्हायरल... पुणे- टिळक रोडवरील हिराबाग चौक परिसरात मंगळवारी रात्री एका मद्यधुंद तरुणींने चांगलाच गोंधळ घातला. तिचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हिराबाग चौकात रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ही तरुणी प्रचंड दारू प्यायलेली होती. काळी जिन्स आणि लाल टॉप घातलेली ही तरुणी अगोदर रस्त्याच्या मधोमध उभी राहून येणार्‍या जाणार्‍या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर ती रस्त्यावर बसली. तिच्या आजू बाजूने बस, कार जात होत्या. काही वेळाने तर ती चक्क रस्त्यावर झोपली. स्वारगेट व खडक पोलीस ठाण्यातील मार्शल तातडीने तिथे पोहचले. पोलिसांनी तिला हटकले. पोलीस पाहिल्यावर ती चपापली आणि निघून गेली़.

व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post