रुई छत्तीसी येथील जनता महाविद्यालयात वृक्षारोपण

 रुई छत्तीसी येथील जनता महाविद्यालयात वृक्षारोपण नगर :   अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या रुई छत्तीसी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले . गावचे सरपंच विलास लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाळके, ग्रामपंचायत सदस्य निलेश गोरे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश बाबर आदि च्या हस्ते महाविद्यालयाच्या मैदानावर वृशारोपण करण्यात आले . यावेळी बोलतांना सरपंच लोखं डे म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याची आवश्यकता असुन आपण सर्वांनी किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य आहे .
         महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबर यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली . तसेच महाविद्यालयात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टि ने दरवर्षी वृक्षारोपण करून त्याची निगा राखली जाते . त्यामुळे कालेजचा परिसर वनराई ने नटला असून निर्सग रम्य झाला आहे.
         भूगोल विभाग प्रमुख प्रा. गणेश साठे यांनी प्रास्ताविक केले .
         यावेळी रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा रविराज सुपेकर , हिंदी विभाग प्रमुख डॉ अर्चना आढाव, गणित विभाग प्रमुख प्रा. डी. ए. गायकवाड , प्राणिशास्र विभाग प्रमुख प्रा. एम. सि. ठाकरे, प्रा सोनवणे आर.सी. पाटोळे के. एन., प्रा. भणगे एस. एस., प्रा. पी. व्ही. पठारे ,प्रा. क्षीरसागर नयना, प्रा. खैरे एस ,प्रा. कोलते एस.ए., प्रा. रणसिंग एम. प्रा. पादिर ए. , प्रा. एन एस लाळगे , प्रा. शुभांगी पवार, कार्यक्रम अधिकारी प्रा शंकर बोरुडे, क्रिडा संचालक प्रा दादासाहेब वाळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा राजेंद्र गोरे, प्रा मोहन पोटरे, प्रा सुहास नवले, प्रा निक्रड, सुरज भोसले, प्रितम म्हस्के आदि उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post