संतापलेल्या पतीनं पोलीस ठाण्यातच पत्नीचा गळा कापला

 संतापलेल्या पतीनं पोलीस ठाण्यातच पत्नीचा गळा कापला पाटणा: बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली आहे. संतापलेल्या पतीनं पोलीस ठाण्यातच पत्नीचा गळा कापला. त्यामुळे एकच खळबळ माजली. जखमी महिलेला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी पतीला अटक करण्यात आली. महुआ पोलीस ठाण्यात ही घटना घडली.


पती सतत भांडत असल्यानं २८ वर्षांची शबनम माहेरी निघून गेली. तिला परत आणण्यासाठी तिचा पती सोनू रानीपोखरला पोहोचला. शबनम आणि सोनू यांचं भांडण मिटावं, समेट घडावा यासाठी शबनमच्या पालकांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस कारवाई होत असताना सोनू संतापला. पोलीस ठाण्याच्या परिसरातच त्यानं तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला.

शबनमच्या कुटुंबीयांनी सोनूला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी सोनूला तुरुंगात टाकलं. शबनमला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शबनमच्या भावानं सोनूविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post