चित्रा वाघ यांनी सुपारी घेऊन तहसीलदार देवरेंची पाठराखण चालवली आहे ,तहसीलदार ज्योती देवरेच तात्काळ निलंबन कराव

 चित्रा वाघ यांनी सुपारी घेऊन तहसीलदार देवरेंची पाठराखण चालवली आहे ,तहसीलदार ज्योती देवरेंच तात्काळ निलंबन करावपारनेर : एकीकडे कोरोना काळात हजारो रुग्णांना शरदचंद्र पवार महाकोव्हिड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार देवून जीवनदान दिले आहे. देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात उल्लेखनीय काम केले असतानाही केवळ एका भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी राज्यातील नेते जर पारनेरमध्ये येत असतील तर भाजपच्या नेत्यांनी सुपारी घेतल्या असल्याचा घणाघाती आरोप शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी केला आहे. यावेळी शेतकरी नेते अनिल देठे,संपत दरेकर,निलेश भोर,सतीश भोर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुपारी घेऊन केली तहसीलदार ज्योती देवरे यांची पाठराखण शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांचा घणाघाती आरोप करण्यात आहे.भाजपा नेत्या चित्राताई वाघ यांनी सुपारी घेऊन केली तहसीलदार ज्योती देवरे यांची पाठराखण शिव प्रहार संघटनेचे संजीव भोर यांचा घणाघाती आरोप या निवेदनात केला आहे.

पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपनंतर नगर जिल्ह्यात मोठे वादंग निर्माण झाले होते मात्र आता त्या क्लिपनंतरची दुसरी बाजूही समोर आली आहे तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध त्यांनी कामात केलेला अनियमितपणा समोर आलेला असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे तसेच त्यांच्या कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध उपोषण सुरू केले आहे.ज्योती देवरे यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली करा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीन दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता मात्र चित्राताई वाघ यांनी सुपारी घेऊन ही भेट घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी केला आहे.एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठिंबा देण्यासाठी चित्रा वाघ यांनी अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजकारणी असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक यांच्या तालुक्यात येऊन पाठिंबा देत असेल तर निश्चितच ही बाब निषेधार्ह असून यामागे सुपारी घेतल्याची चर्चा सध्या तालुक्‍यांमध्ये होत असल्याच संजीव भोर यांनी सांगितला आहे.

एकीकडे राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्या प्रश्नावर आवाज उठवणे अपेक्षित असुन भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांना समर्थन देऊन एक प्रकारे पाठीशी घातल्याचा असल्याचा आरोप भोर यांनी केला आहे.शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट व मनमानी कारभारा विरोधात आंदोलन करणारा महसूल कर्मचारी,तलाठी संघटनेचे सदस्य यांना आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनास लेखी पाठिंबा दिला.

शिवप्रहार संघटनेच्या वतीने संजीव भोर यांनी भ्रष्ट व मनमानी कारभार करणार्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरेंवर निलंबनाची,तसेच सरकारी सेवा शर्ती भंग केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी जिल्हाधिकारांकडे केलीआहे.आत्महत्या करण्याचा इशारा देणारा ज्योती देवरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post