सकारात्मक...महाराष्ट्रातील हा जिल्हा झाला करोनामुक्त, शून्य ऍक्टिव्ह रूग्ण

 राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त भंडारा:  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट असतानाच राज्यातील राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.

भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. भंडाऱ्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी 578 जणांचे सँपल तपासण्यात आले. त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं आढळून आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post